नगरसेवक सुनील बांदेकर यांनी नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !

नगरसेवक सुनील बांदेकर यांनी नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जिल्हा नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक श्री.सुनील बांदेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे
जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देत लक्ष वेधले आहे. जिल्हा नगरोत्थान -2020-21 मधील मंजूर झालेल्या कामांबाबत.कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सन 2020-21 मध्ये जिल्हा नगरोत्थान निधीमधून मंजूर झालेल्या विकास कामांची यादी कुडाळ नगरपंचायतीस प्राप्त झालेली आहे. सदर यादीतील सार्वजनिक कामे वगळता शिवसेना नगरसेवक यांची कामे यादीमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी सुचविलेल्या कामांच्या यादीस आमचा कोणताही विरोध नसून त्या यादीमध्ये सार्वजनिक कामे समाविष्ट करण्यात यावीत. खालील कामे जिल्हा नगरोत्थान आराखडयात मंजूर आहेत.कामे पुढीलप्रमाणे आहेत.1) अभिमन्यू हॉटेल ते जिजामाता चौक रस्ता रुंदीकरण, दुपदरीकरण करणे व पथदिप बसविणे. 2) मच्छीमार्केट करिता शासकीय जागा 324/1 व 2 ताब्यात घेण्यासाठी शासकीय मुल्यांकनाप्रमाणे होणारी रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करुन मिळणारी रक्कम भरणा करणे.3) कुडाळ शहरातील अंतर्गत जलवाहिनी नुतनीकरण करणे. 4) क्षितीज अपार्टमेंट जवळील मुख्य रस्त्यावर ब्रिज बांधणे.5) कुडाळ शहर प्रवेशद्वार उभारणे आकुडाळ एस. टी. डेपो ब) हॉटेल आर.एस.एन.6) कुडाळ भंगसाळ नदी बंधाऱ्यापूर्वी स्लॅब ड्रेन बांधणे. 7) नगरपंचाय मालकीच्या जागेत हॉटेल अभिमन्यू समोर गार्डन विकसीत करणे.तरी वरील सार्वजनिक विकासकामे सन 2020-21 मध्ये जिल्हा नगरोत्थान यादीत सामाविष्ट करण्यासाठी नगरसेवक सुनील बांदेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..