सिंधुदुर्ग /-

शिक्षकांच्या DCPS रकमा संबंधित जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेबाबत.
शिक्षक परिषद प्राथमिक विभागने वेधले शिक्षणाधिकारी यांचे लक्ष! वेधले आहे.गणेश नाईक , सुनिल करडे अध्यक्ष कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जे शिक्षक आंतर जिल्हा बदलीने स्व जिल्हा बदली होऊन गेलेले आहेत. त्यांचे DCPS खाते क्रमांक संबंधित जिल्हा परिषदेला कळविलेले आहेत.परंतु अदयापही आपल्याकडील त्या शिक्षकांची DCPS रक्कम संबंधित जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. आपल्याला ज्ञात असेलच की, सध्या राज्यात सर्वत्र DCPS मघुन NPS योजनेवे खाते उघडण्यासाठी कार्यवाही सुरु असून NPS सक्ती केली जात आहे, परंतु जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची DCPS मधील रक्कम बदली झालेल्या जिल्ह्यात वर्ग केलेली नसल्याने DCPS चा ओपनिंग बॅलन्स झिरो ( ०) रुपये दाखवत आहे. त्यामुळे DCPS हिशोबाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या सर्व शिक्षकांची DCPS रक्कम संबंधित जिल्हा परिषदेकडे लबकरात लवकर वर्ग करण्यात याची असे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष श्री .गणेश नाईक आणि सुनील करडे कार्यवाह यांनी आपल्या निवेदन सादर करताना म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page