आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कारांचे वितरण..

पत्रकार भुषण आरोसकर,ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर,राजेश मोंडकर,
जतिन भिसे,मोहन जाधव यांना करण्यात आले पुरस्कार प्रदान

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा आज सावंतवाडी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी येथे येथे पार पडला. पत्रकार संघाच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचे वितरण माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार युवा पत्रकार भुषण आरोसकर यांना प्रदान करण्यात आला. तर कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार राजेश मोंडकर, बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे, जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक विकास सावंत, व्हिक्टर डॉन्टस, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, अण्णा केसरकर, अँड. अनिल निरवडेकर, सीमा मटकर,पत्रकार अँड. संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, अशोक दळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर , सागर चव्हाण,
अभिमन्यू लोढे, मयूर चराठकर, हर्षवर्धन धारणकर ,दीपक गावकर, प्रवीण माजरेकर, उमेश सावंत, अनत जाधव, रूपेश हिराप, रोहन गावडे, निखिल माळकर , प्रसना राणे, विनायक गावस, भक्ती पावसकर, प्रसन्ना गोदावळे,योगिता बेळगावकर ,भरत केसरकर, साबाजी परब, सिद्धेश पुरळकर,यांसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभम धुरी, प्रास्थाविक तालुका अध्यक्ष विजय देसाई, तर आभार खजिनादर रामचंद्र कुडाळकर, यांनी केले उपस्थित मान्यवर याचे स्वागत तालुका अध्यक्ष विजय देसाई व सचिव अमोल टेबकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर, मयूर चराठकर, तसेच अन्य पत्रकार पदाधिकारी यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page