संतोष शिरसाट यांनी मानले कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार..
कुडाळ /-
कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या काल झालेल्या नागरी सत्काराला शहरवासियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन कुडाळ शहराची एकजुटी दाखवली त्याबद्दल कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार सांगत कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मानले.पुढे
शिरसाट म्हणाले की,कुडाळचा महत्वाचा पाणि प्रश्न म्हणजे भंगसाळ नदीवरील बंधारा बांधणे हाच,होता हा बंधारा व्हावा ही कुडाळ शहरातील जनतेची बरेच वर्षाची ही मागणी होती ती मागणी आमदार वैभव नाईक यांनी पुर्ण केली म्हणून कुडाळ शहरातील नागरीकांच्या इच्छेनुसार आमदर नाईक यांचा नागरी सत्कार महापुरुष देवालयाला श्रीफळ अर्पण करुन कुडाळ वासियांनी सत्कार केला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले तुम्ही साथ द्या शहराचा विकास तुमच्या सहकार्य घेऊन करणार आहे मागच्या पाच वर्षात कुडाळ एस टी स्टॅण्ड बसस्थानक, ऐतिहासिक घोडेबाव, क्रिंडांगण, मच्छिंद्र कांबळी नाट्य गृह, बॅडमिंटन सभामंडप आणि भंगसाळ नदी बंधारा ही कामे मार्गी लावली तुम्ही आज कुडाळ शहरवासियांनी माझ्या अंगावर मायेची शाल घातली हीच माझ्या कामाची पोचपावती दीली यापुढेही भंगसाळ नदीजवळ सुशोभीकरण गार्डन, गणेश घाट यासाठी पाच कोटी निधी देत आहे तर कुडाळ नगरपंचायतीला ठीक अग्निशमक बंब देण्याची तयारी माझी आहे असेही आम नाईक यांनी सांगितले.