कुडाळ दिवाणी न्यायालाय परिसरात रस्ता सुरक्षा,अपघात,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन कार्यक्रम संपन्न..

कुडाळ दिवाणी न्यायालाय परिसरात रस्ता सुरक्षा,अपघात,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन कार्यक्रम संपन्न..

राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय,मुंबई अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळ /-

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय,मुंबई अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाणी न्यायालय (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, कुडाळ यांनी,रस्ता सुरक्षा व अपघात याबाबत कार्यक्रम कुडाळ दिवाणी न्यायालाय परिसरात संपन्न झाला.राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या कायदेशीर योजनांची जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन म्हणून या तिन्ही विषयांचे एकत्रित मार्गदर्शन शिबीर झाले.कुडाळ शहरातील श्री देव पाटेश्वर मंदीर कुडाळ बाहेरील हाॅल मध्ये कुडाळ न्यायालयाचे आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात वरिष्ठ कार्यालयाचे न्यायाधीश,मा.श्री.डि. बी म्हालटकर ,.सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक तथा दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ कुडाळचे न्यायाधीश मा. श्री. एस. बी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले.या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा व अपघात या विषयासाठी,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग ओरस यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये कार्यायाचे प्रमुख उपस्थिती प्रादेशिक परिवहन अधिकारी ळश्री. जितेंद्र पाटील व त्यांचे सहकारी यांनी याविषयी अतिशय अप्रतिम माहिती देवून अपघात व रस्ता सुरक्षा अभियानात लोकांना सुरक्षितेविषयी आव्हान केले.

तसेच जिल्हा वाहातुक शाखा सिंधुदुर्ग चे सहायक पोलिस निरीक्षक श्री. भोसले यांनी देखील कार्यक्रमात सदर विषयाची माहिती दिली.

सौ.सोबिना फर्नांडिस, सहायक सरकारी अभियोक्ता कुडाळ यांनी रस्ता सुरक्षा व अपघात व राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजनांची कायदेशीर माहीत व योजनांचा आढावा दिला.कुडाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ श्री. अमोल सामंत… यांनी मुलाला कायद्याने वयाची अट पूर्ण होत असेल तरच वाहन परवाना व पालकांनी वाहन चालविणेस संमत्ती/ परवानगी द्यावी..सर्व सामान्य लोकांना समजेल अशी माहिती दिली.

मराठी भाषा संवर्धन दिन
या विषयावर प्रमुख वक्ते कुडाळ बार असोसिएशनचे विधीज्ञ श्री एम. डी. कुंटे यांनी..मराठी भाषा व तिचा इतिहास , ती हजारो वर्षांपासून रुढी परंपरेने नटलेली भाषा…तिचा गोडवा वर्णावा तितका अफाट आहे.पण ती जोपासणे कसे शक्य आहे याची जाणीव करून दिली.

कुडाळ हायस्कूल कुडाळ चे शिक्षक श्री.जी.बी.पवार यांनी मराठी भाषाचे व्याकरणात कसे शब्दांचे अर्थ असतात व बदलतात.याची उत्तम माहिती दिली आहे.

अध्यक्षीय भाषणात.कायदे व त्यातील तरतुदी,अपघात विषयी घटना.याबाबत माहिती देऊन कायद्याच्या चौकटीती विविध नियमांचे पालन कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग कार्यालयाचे सचिव मा.माल्हटकर यांनी.आपले भाषणात..आपण वकिल असताना…कुडाळ कोर्टात यायचो…तेव्हाचे दिवस व तेव्हा पाहिलेले…निर्णय हे देखील मराठी भाषेतील आहेत. त्यामुळे मराठी भाषा..त्यावेळी सुद्धा निर्णयासाठी होती.

कोर्टातील निर्णय हे न्यायालयीन शब्दातील असलेने… तहसीलदार प्रांत किर्यालयात त्या शब्दाची व्यवस्थित मांडणी केली जात नाही.
कोकणी माणूस तडजोड करताना पूर्वी गावातील वरिष्ठ लोक पंच नेमून आपली भूमिका स्पष्ट किंवा निर्णय घेण्यात येत होते पण त्यांच्या विरोधात कुणी गेले की, तो मग कुणाचेच ऐकत नाही हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे.

पुढे त्यांनी..रस्ता सुरक्षा व अपघात याविषयी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेले पुस्तक नक्की वाचा….असे आवाहन केले.

कुडाळ पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक श्री. कोरे साहेब व द्राफिक पोलिस कर्मचारी वर्ग…यांनी देखील कार्यक्रमात उपस्थित दर्शविली होती.
टेम्पो वाहनधारक टॅक्सी वाहनधारक व रिक्षा धारक यांनी ही उपस्थिती दर्शविली होती.वकिल बार असोसिएशनचे वरिष्ठ विधीज्ञ व ज्युनिअर वकिल तसेच दिवाणी न्यायालय कुडाळ चे कर्मचारी वर्ग देखील या कार्यक्रमात सहभागी होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन कुडाळ दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सौ. आर्या अडुळकर यांनी केले.तर ..आंभार..श्री. गौरव कुबल कनिष्ठ लिपिक दिवाणी न्यायालय कुडाळ यांनी केले.

अभिप्राय द्या..