वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुका शिवसेना व आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्याचा सन्मान – वेंगुर्ला
मराठी माणसाला न्याय देण्याचे काम हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केले.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले नेतृत्व महाराष्ट्राला नेतृत्व मिळाल्याने सर्वाना न्याय देण्याचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते करत आहेत.वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करून आगामी निवडणुकांची नांदी केलेली आहे. या नंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल. तीच खरी बाळासाहेबांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले.
वेंगुर्ला तालुका शिवसेना व आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना काळात योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा येथील साई डिलक्स सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, जळगावच्या शिवसेना उपजिल्हा संघटक मनीषा परब, उपजिल्हा प्रमुख आबा कोंडस्कर, सुनील डुबळे, आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुमन निकम, संदेश निकम, तुषार सापळे, शहर प्रमुख अजित राऊळ, युवा सेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, आरवली उपतालुका प्रमुख सुधाकर राणे, शहर समन्वयक विवेक आरोलकर, सुरेश भोसले, अभिनय मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम तालुका कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ठाकरे यांच्यावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन दाभोली येथील ज्येष्ठ शिवसैनिक मोहन तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध रांगोळीकार कट्टा मालवण येथील समीर चांदरकर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर कोरोना काळात काम केलेले पोस्ट ऑफिस कर्मचारी राजेंद्र निनावे, दशरथ हळदणकर, राजन पालकर, प्रकाश चव्हाण, रघुनाथ पेडणेकर, संतोष परब, विजवितरण चे कर्मचारी बाळा गावडे, वसंत वराडकर, किशोर मोर्ये, हर्षद मुळीक, विशाल चेंदवणकर, प्रवीण कांबळी, नवीन परब, प्रथमेश भगत, शेखर पंडित, साहिल गावडे, संदेश शिरोडकर, आदित्य खानोलकर, पवन गायकवाड, गणेश राऊळ, वेंगुर्ला गॅस सर्व्हिस चे कर्मचारी निलेश तुळसकर, अनिषा देऊलकर, मीनाक्षी गोडकर, गीतांजली नाईक, करिश्मा रेडकर, सुरेश निरवडेकर, शैलेश पेडणेकर, सुभाष सरमळकर, राजन सावंत, ओंकार मुळगावकर, भारत संचार निगमचे कर्मचारी प्रवीण राजापूरकर, राजन केरकर, पत्रकार दीपेश परब,तसेच भटवाडी शाखाप्रमुख दिलीप राणे तसेच सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार एकनाथ कुडव, ज्ञानदेव चोपडेकर, मेरी फर्नांडिस, स्मिता फर्नांडिस, बिनविरोध निवडून आलेल्या समृद्धी कुडव यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक तुषार सापळे, आबा कोंडस्कर, सुनील डुबळे,नंदन वेंगुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले.