देवगड /-
आंबा उत्पादक मेळावा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे राजकीय हितासाठी नाही आज निसर्गाने जी परिस्थिती निर्माण केली त्यावर शेतकरी वर्गाकडून होणारी सातत्याने विचारणा त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर अँड माणगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकरी आणि मार्गदर्शक यांच्यामध्ये संवाद घडून आणण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड व स्नेह सिंधू पदवीधर यांच्या सहकार्याने आंबा बागायतदारांच्या मेळावा येथील भवानी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.जिल्हा बँक ही फक्त कर्ज देण्यासाठीचं मजबुत नसून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या मागे उभी राहत आहे.असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात 39 हवामान केंद्रे आहेत आणखी 19 केंद्रे जिल्ह्यात हवीत यासाठी पालकमंत्री यांचे कडे याबाबत मागणी केली आहे.२०१७-१८,२०१८-१९ ची पीक विम्याची सर्व तालुक्याला मिळाली मात्र देवगड तालुक्याची २८ कोटी रक्कम अद्याप मिळालीच नाही.आंब्याला हमीभाव अद्याप मिळत नाही दलाली मोडीत काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आंबा व काजू पिकाच्या प्रोड्युसर कंपन्या झाल्या आंबा व काजू बागायतदारांना त्याचा फायदा होईल.भविष्यात आंबा उत्पादन शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील यासाठी काम करूया असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.यावेळी उपस्थित मार्गदर्शक धनंजय गोलम व अजय मुंज यांनी आंबा बागायतदार यांनी सेंद्रीय खताचा वापर कसा करावा, तुडतुडा व अन्य कीड रोग उदभवला तर यांपासून आंबा पिकाची काळजी कशी करावी याबाबत माहिती दिली.यावेळी अँड अविनाश माणगावकर, अजय मुंज,धनंजय गोलम, विद्याधर जोशी, चांदोशी सरपंच प्रणय चांदोसकर, बँक संचालक प्रमोद धुरी ,संभाजी साटम, भाई आचरेकर, आदी तसेच मोठ्या संख्येने आंबा बागायतदार उपस्थित होते.