कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !गढीताम्हणे – रहाटेश्वर येथे आयोजन

कणकवली/-

समस्त कदम मराठा परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन यावर्षी रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी तळकोकणातील निसर्गरम्य देवगड तालुक्यातील गढीताम्हणे-रहाटेश्वर या गावातील श्री देव नागेश्वर मंदिर (राजसत्ता मंदिर) च्या मागील मैदानावर सकाळी ७ ते ३ या वेळेत घेण्यात येणार आहे. तरी राज्यातील समस्त कदम मराठा बंधू-भगिनी उपस्थित राहण्याचे आवाहन रहाटेश्वर- गढीताम्हणेतील कदम परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

यापूर्वीचे पहिले संमेलन श्री क्षेत्र तुळजापूर व दुसरे संमेलन गिरवी-फलटण येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे स्नेहसंमेलन सिंधुदुर्गातील निसर्गरम्य गढीताम्हणे-रहाटेश्वर गावात बहुसंख्य कदम असलेल्या गावात आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील कदम बंधूंचा परिचय व्हावा, कदम घराण्याचा वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी, संपर्कातून परिवारातील उद्योजक-व्यावसायिकांचे तरुण पिढीच्या उन्नती दृष्टीने सहकार्य, मार्गदर्शन व्हावे, वयोवृद्ध आणि यशस्वीतांचे कदम परिवाराचे वतीने कौतुक व्हावे हा या संमेलना मागील हेतू आहे.

तरी सिंधुदुर्गातील समस्त कदम मराठा बंधू-भगिनींनी आपल्या उपस्थितीसाठी खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा जेणेकरून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात सुलभ होईल असे आवाहन कदम परिवाराकडून करण्यात आले आहे.

राजन कदम – 9422374145
श्रेयश कदम – 9420276093
समीर कदम – 9833911801
श्रीकांत कदम – 9404443775

अभिप्राय द्या..