कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ रुग्ण सापडले आहेत,हे दोन रुग्ण ओरोस येथील ०१, आहे आणि कुपवडे येथील ०१ कोरोना रुग्ण आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५८२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५७०कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या १२ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १३७९ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १३४० आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ३० आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page