कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी सुमारे इतके 71.44 टक्के मतदान झाले. मतदारांनी उत्साह दाखविला असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. कुपवडे प्रभाग क्रमांक 1 येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली मात्र तात्काळ या ठिकाणी दुसरी मशीन दिल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला असून कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी, कुपवडे, वाडोस, गोठोस, वसोली, पोखरण, आकेरी, गिरगाव , गोवेरी या नऊ ग्रामपंचायतीच्या एकूण 75 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक मतदान प्रक्रिया शुक्रवारी 27 मतदान केंद्रावर सुरळीत पार पडली. कोणत्याही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या नऊ ग्रामपंचायती करिता एकूण एवढ्या 12 हजार 875 मतदारांपैकी सुमारे 9 हजार 198 टक्के एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स. 8:15 ते 9: 10 या कालावधीत कुपवडे ग्रामपंचायतीच्या फौजदारवाडी प्रभाग क्रमांक येथील मतदान ईव्हीएम मशीनीत बिघाड झाला. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मात्र तात्काळ दुसरी ईव्हीएम मशीन तात्काळ देण्यात आली. त्यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.
ग्रामपंचायत निहाय मतदान आकडेवारी:- आकेरी 75.57 टक्के, पोखरण कुसबे 63.48 टक्के, गोवेरी 76.82 टक्के, वाडोस 75.58, गोठोस 74.63, माड्याची वाडी 68.18, कुपवडे 65.15, गिरगाव कुसगाव 78.26, वसोली 59.39