कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील माणगाव मळावाडी येथील एका धाडसी चोराच्या मुसक्या आवळल्या आज पोलिसांनी आवळल्या आहेत, माणगाव येथे काही दिवसापूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत या चोराने केली होती चोरी.सौ. अनुराधा खरवंडे यांच्या घरातील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील कुडी आणि रोख रक्कमेसह सुमारे १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल गेला होता चोरीस ,याप्रकरणी कुडाळ एल.सी.बी पोलीस यांनी आज धडक कारवाई करत एसटी बस स्थानकावरून आज दुपारच्या सुमारास त्या आरोपीला अटक केली आहे.सदर पकडलेल्या आरोपीने सदर केलेल्या गुन्ह्याची त्या आरोपींनी कबुली देखील यावेळी दिली आहे. ही कारवाई एल सी बी चे पोलीस प्रमोद काळसेकर, सुधित सावंत, अनिल धुरी, रवींद्र इंगळे, बाळू पालकर, प्रकाश कदम, वालावलकर, शेळके यांनी केली आहे.