गेले 5 ते 6 दिवस धुरीटेंब नगर पिंगुळी येथे मनुष्यवस्तीत माकडांचा हैदोस सुरु होता दिनांक 28/12/2020/रोजी सदर माकडाने सौ .अरुणा अरुण धुरी ,सौ. विजया विलास धुरी ,श्रीमती .सुलक्षणा भदू धुरी यांच्यावर हल्ला करून पायाचा चावा घेतल्याने त्या वैद्यकीय उपचार घेत आहेत सदर हल्यात प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या इतर महिलांवरही सदर माकडाने हल्ला चढून त्यांना ओरबडल्याने त्यांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागले सदर घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानीय अनंत धुरी यांनी याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम,सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अनिल गावडे यांना दिली व ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.सांयकाळी 6च्या सुमारास या माकडाला स्थानिकांच्या सहकार्याने अखेर जेरबंद करण्यास कोकण वाईल्ड लाईफच्या टीमला व वनविभागाला यश आल नंतर या माकडाला वैद्यकिय उपचासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. यावेळी वनविभागा मार्फत वनरक्षक श्री. सावंत,कोकण वाईल्ड लाईफचे अध्यक्ष अनिल गावडे, वेंगुर्ला प्रतिनिधि नाथा वेंगुर्लेकर, उपसरपंच श्री .सागर रणसिंग , श्री.मिलिंद धुरी, श्री विष्णु धुरी,श्री. दिपक गावडे, विशाल धुरी , रुपेश धुरी, विनय येरम, सौमिल धुरी, केतन पिंगुळकर , मिलिंद धुरी, शिवराम (आबा )धुरी, संतोष भदु धुरी,आबा वारंग आदि ग्रामस्थ उपस्थित होते.