वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनकर संदर्भात वाहन मालकांना न्याय मिळण्याबाबत आज मंगळवारी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी वाहन परिवहन अधिकारी परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन मालकांनी वाहन परिवहन कार्यालयात वाहनकर भरलेला असूनही आपल्या कार्यालयीन काही अधिकारी तसेच कर्मचाऱ्याकरवी झालेल्या अफरातफरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही वाहन मालकांना वाहनकर भरलेला नाही,असे सांगून आपल्या कार्यालयीकरवी वाहन परवाना कारवाहीस सामोरे जाऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ज्याप्रमाणे आपल्याकरवी जी या अफरातफरी संदर्भात अंतर्गत कारवाही चालू आहे,ती तशीच चालू ठेवावी.पण जो त्रास वाहन मालकांना कर भरूनही सहन करावा लागत आहे,त्यासाठी आपण वाहन परवाना,नूतनीकरण, इन्शुरन्स, पीयुसी इत्यादी कागदपत्रे यावर लावलेली स्तब्धता (ब्लॉक) तात्काळ हटवून वाहने पूर्ववत वाहन चालकांना चालवता येतील,असा निर्णय घ्यावा.तसेच तुमच्या कार्यवाहीचा निर्णय लागल्यावर जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्यती कार्यवाही करून अफरातफरीत झालेली कराची रक्कम दोषींकरवी भरून घ्यावी,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्ह्यातील वाहनधारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page