एस्. टी.प्रशासनाला भाजपा जाब विचारणार
वेंगुर्ला
मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ६० चालक व वाहक मुंबईतुन सेवा बजाऊन आले असता त्यांची ताबडतोब कोरोना चाचणी होणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे कारण सांगून प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना घरी पाठविण्यात आले व आज २१ डिसेंबरला त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली.
चालक व वाहकांपैकी कोरोना पाॅझिटीव्ह आल्यास प्रशासनास जबाबदार धरणार –
दरम्यान एस्. टी.प्रशासनाने मुंबईतुन आलेल्या चालक व वाहकांची ताबडतोब कोरोना चाचणी करणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे कारण सांगून घरी पाठवुन घरातच अलगिकरणात रहावे असे प्रशासनाने सांगितले. खरे तर सर्व चालक व वाहकांना कोरोना तपासणी होण्यापूर्वी एकत्र स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे असताना बेजबाबदार पणे त्या कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात आले.याबाबत चालक व वाहकांना घेऊन भाजपा शिष्टमंडळ आगार व्यवस्थापकांना भेटून याबाबत जाब विचारणार आहे.तपासणीपुर्वी कर्मचाऱ्यांना घरी पाठविल्यामुळे जर तपासणीनंतर त्यापैकी कोणी वाहक चालक कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आल्यास त्यांच्या कुटुंबियांना पण कोरोनाची लागण लागण्याची भीती निर्माण झाली आहे व असे झाल्यास त्याची पुर्ण जबाबदारी एस्.टी.प्रशासनावर असणार आहे .ह्या प्रश्नी उद्या मंगळवारी सकाळी ११ वा.सर्व वाहक व चालक यांना सोबत घेऊन भाजपाचे शिष्टमंडळ आगार व्यवस्थापकांना भेटून याबाबत जाब विचारणार आहे, असे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी स्पष्ट केले आहे.