सिंधुदुर्गनगरी /-
कोंकण महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांना १९ रोजी एका महत्त्वाच्या शासकीय बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आल्याने त्यादिवशी होणारा खारेपाटण ते बांदा अभ्यासदौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हा दौरा जानेवारी २०२१च्या पहिल्या आठवड्यात होईल, असे समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सतीश लळीत यांनी कळविले आहे. मात्र १८ रोजीचा हातखंबा ते खारेपाटण हा दौरा नियोजनाप्रमाणे होणार आहे.