कोल्हापूरः
अर्जूनवाङा( ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. संपदा नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवङ झाली. निवङणूक अधिकारी म्हणून राशिवङे ‘ बूद्रूक’ येथील मंङल अधिकारी देवीदास सूर्यकांत तारङे यांनी काम पाहीले.
अङीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवङणूकीत थेट जनतेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरद पाटील सरपंच झाले होते. पण त्यांनी काही तांत्रीक कारणामूळे सरपंचपदाचा राजीनामा राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकङे दिला होता. त्यामूळे या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सौ. संपदा नामदेव चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवङ झाली.
निवङीनंतर नूतन सरपंच सौ. संपदा नामदेव चौगुले यांचा सत्कार निवङणूक अधिकारी देवीदास तारङे व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सरपंच र्सो.संपदा चौगुले म्हणाल्या””ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यानां व गावातील जेष्ठानां विश्वासात घेवून ग्रामपंचायतीचा कारभार पारर्दशक करणार आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना जनतेसमोर पोहचविणार आहे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून गावचा चेहरामोहरा बदलणार आहे’ तसेच गावच्या क्रिङांगणाचा व तलावाचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
निवङीनंतर सरपंच गटाच्या कार्यकत्यांनी फटाक्याची आतषबाजी केली
यावेळी कसबा वाळवेचे मंङल अधिकारी विशांत विलास भोसले. तलाठी अशोक पाटील”’ ग्रामसेवक सूनिल भिकाजी गूरव”’ माजी सरपंच शरद पाटील””राष्ट्रवादी पक्षाचे नेते नामदेवराव चौगुले. माजी सरपंच बाजीराव चौगुले. दत्त दूध संस्थेचे अध्यक्ष जालिंधर पाटील” श्री कूष्ण दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौगुले.तंटामूक्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश माने””अर्जूनवाङा विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष पंङीत पाटील” जेष्ठ नेते बाजीराव किल्लेदार””उपसरपंच पांङूरंग गोविंद कांबळे. ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील””मारूती म्हेकर”” सौ. दिपाली पाटील””सौ. सूवर्णा बरगे””श्रीमती उमाताई बबन चौगुले आदीसह गावातील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आभार राष्ट्रवादीचे नेते नामदेव चौगुले यांनी मानले.