नवी दिल्ली: एसटी, रेल्वे आणि विमानातही ज्येष्ठ नागरिकांना  हाफ तिकीटात सफर करता येणार आहे. केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना हे गिफ्ट दिलंय. विमानाचा प्रवास महागडा असल्यानं सामान्य नागरिक त्यानं प्रवास करत नाहीत, मात्र, हा प्रवास वेळ वाचवणारा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना याची सर्वाधिक गरज आहे. हेच पाहता आता एअर इंडियानं ज्येष्ठ नागरिकांसाठी विमानाच्या तिकीटाच्या मूळ दरात अर्ध्यानं कपात केलीय.
आता तुम्ही म्हणाल, हाफ तिकीट कुठं काढायचं?
ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्षांहून अधिक आहे, अशा प्रवाशांना एअर इंडिया अर्ध्या दरात विमानाचं तिकीट देणार आहे. यासाठी तुमच्याकडे वयाचा पुरावा असणं गरजेचं असणार आहे. विमान उड्डयन मंत्रालयानं ही माहिती दिलीय. शिवाय एअर इंडियाच्या वेबसाईटवरही याबाबतची माहिती देण्यात आलीय.

एअर इंडियानं अर्ध्या दरात प्रवास करण्यासाठी काही अटीही घातल्यात…
पहिली अट ही भारतीय नागरिकत्त्वाची आहे. दुसरी अट 60 वर्षांहून अधिक वय असण्याची आहे. तर, एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासच्या तिकीटावरच ही सवलत दिली जाईल. याद्वारे तुम्ही भारतात कुठेही फिरु शकता. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांनाही पूर्ण तिकीट द्यावं लागणार आहे. हाफ तिकीट तुम्हाला बूक करायचं असेल तर ते ७ दिवसांआधी बूक करावं लागणार आहे. त्याआधी बूक केलेल्या तिकीटावर ही सवलत लागू नसेल.

एअर इंडियानं यापूर्वी स्किमची घोषणा केली होती. मात्र आता उड्डयन मंत्रालयानंच त्याला मान्यता दिलीय. केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करणार आहे, आणि कंपनीची 100 टक्के भागीदारी विकणार आहे. त्यासाठी टाटा ग्रूपनंही बोली लावलीय. त्यातच तोटा कमी करण्याचा आणि एअर इंडियाच्या प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. हेच पाहता आता  सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत देऊ केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page