मुंबई : एखाद्या व्यक्तीकडे बघून त्याच्या डोक्यात काय सुरु आहे, याबाबतची उत्सुकता आपल्याही मनात येते. मात्र, फेसबुक याबाबतची लवकरच ब्रेन मशीन इंटरफेस अंतर्गत एक यंत्रणा आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी फेसबुकचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांमध्ये फेसबुकला यश आलं तर युजरच्या डोक्यात नेमकं काय सुरु आहे याची थेट माहिती फेसबुकला समजणार आहे. दरम्यान, फेसबुकची कर्मचाऱ्यांबोत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत, एखादा मोठा लेख युजरला बुलेट पॉईंटर्समध्ये सारांशमध्ये वाचता यावा, यासाठी यंत्रणा काम करत असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडून देण्यात आली. ‘बजफीड न्यूज’ने याबाबत माहिती दिली आहे
युजरच्या डोक्यातील विचार खरंच माहित पडू शकतील?

उद्योगपती एलोन मस्क यांची न्यूरोलिंक कंपनी ब्रेन मशीन इंटरफेसवर काम करत आहे. या यंत्रणेअंतर्गत केसापेक्षाही बारीक चिप मेंदूत टाकून संबंधित व्यक्तीच्या डोक्यातील विचार जाणून घेतले जाते. यावर सध्या संशोधन सुरु आहे. जे लोक बोलू शकत नाहीत, त्यांच्यासाठी अशाप्रकारची यंत्रणा विकसित करण्याची इच्छा एलोन मस्क यांची आहे. मात्र, फेसबुक युजरच्या डोक्यातील विचार जाणून घेण्यासाठी या संबंधित यंत्रणेचा वापर करण्याची शक्यता आहे.

फेसबुरने 2019 साली न्यूरल इंटरफेस स्टार्टअप CTRL लॅब्सचं अधिग्रहण केलं होतं. या अंतर्गत कंपनी ब्रेन रिडींगचं काम करत आहे. हा प्रोजेक्ट जर यशस्वी ठरला तर युजरच्या डोक्यात नेमके काय विचार सुरु आहेत याचा अंदाज बांधता येणार आहे.

फेसबुकने मार्च 2020 मध्ये आपल्या ब्लॉगस्पॉटमध्ये सांगितलं होतं, कंपनी अशी यंत्रणा बनवू इच्छिते की जे युजरच्या मेंदूत काय विचार सुरु आहेत ते सांगू शकेल. ब्रेन मशीन इंटरफेसच्या संशोधनासाठी फंड पुरण्याबाबत चर्चा झाली होती.

युजरला आता मोठा लेख वाचण्याची गरज पडणार नाही?

दरम्यान, फेसबुकची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फेसबुकवर एखादा मोठा लेख असेल तर तो संपूर्ण लेख न वाचता युजर्सला त्या लेखाचा सारांश वाचता यावा, यासाठी टेक्निकल टीम काम करत असल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे फेसबुक कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा झाली. याबाबत बजफीड न्यूजने माहिती दिली आहे.

फेसबुकच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या या गुपीत बैठकीची ऑडिओ क्लीप आपल्याकडे आहे, असा दावा बजफीड न्यूजने केला आहे. याबाबत सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, फेसबुकच्या हजारो कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकी बरोबरच काही कंपन्या आणि अधिकाऱ्यांचे प्री रेकॉर्डेड मेसेज आपल्या हाती लागल्याचा दावा बजफीड न्यूजने केला आहे.

फेसबूक कर्मचाऱ्यांच्या बैठकीत आर्टिफिशिअल इंटिलेजंस असिस्टंट टूल TDLR सादर करण्यात आला. TDLR म्हणजे Too Long Didn’t read. या टूलमुळे न्यूज आर्टिकला सारांश युजरला दिसेल. हा टूल मोठ्या न्यूज आर्टिक्लसला बुलेट पॉईंटमध्ये तोडेल, जेणेकरुन युजरला पूर्ण लेख वाचण्याची आवश्यकता पडणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page