कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिनाक १५ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहिती नुसार २० कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०८ कोरोना रुग्ण आहेत.तर ओरोस येथील ०२ ,कसाल ०१,पिंगुळी ०१, बांबुळी ०२,खुंटळवाडी आईनमळा ०१, कुडगाव नेरूर ०१,गोंधीयाळे ०१,
नेरूर ०१,पाट ०१,वालावल ०१ असे एकूण कुडाळ तालुक्यातील २० कोरोना रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात एकूण ५३३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५०३ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या ३० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण १३०२ तर बरे झालेले रुग्ण १२०२ आणि सक्रिय रुग्ण ५५,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ४० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.