कुडाळ /-
भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ञ, तत्त्वज्ञ थोर समाजसुधारक, ब्रिटिश भारताचे मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, धरण बांधून सिंचनाची दूरदृष्टी दाखविणारे, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरपंचायत गटनेते बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा समन्वयक, जिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, किरण शिंदे, नागेश जळवी, स्वप्नील शिंदे, विजय मातोंडकर, मिलिंद बावकर, श्री. शहा आदी शिवसैनिक उपस्थित होते.