मसुरे /-

कोविड महामारी सारखे भयंकर संकट जगभरात हाहाकार माजवित असताना सर्व स्तरावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा वेळी केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाच्या कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करीत अनलॉक नंतर विलेपार्ले पूर्व स्थित ISO मानांकित व नामांकित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल खेळासाठी पुनःश्च सज्ज झाले आहे.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ मोहन राणे माहिती देतात, कोविड महामारीच्या काळात महामारीचा प्रभाव रोखण्यासाठी काही महिने संपूर्ण संकुल बंद ठेवण्यात आले होते. परंतु एवढे मोठे जरी संकट आले तरी त्या संकुलाची काळजी व स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यात आली. अनलॉक नंतर संकुल खेळाडूंच्या स्वागतासाठी पुन्हा चालू करण्यापूर्वी योग्य स्वच्छता पडताळणी व काटेखोर काळजी घेण्यात आली होती. संपूर्ण संकुलाचे निर्जंतुकीकरण करणे कीटकनाशके वापरून सर्व जागा स्वच्छ करणे जागोजागी हँड सॅनिटाईझर बसवणे टेम्परेचर गन तसेच पल्स ऑक्सिमिटर च्या सोयी करणे कोविड पासून बचाव करण्याच्या हेतूने संकुलामध्ये भित्तिचित्रे बसविण्यात आली आहेत. तसेच सर्व प्रशिक्षक व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व कोविड अँटिबॉडीज टेस्ट करण्यात आली आहे. वरील सर्व कामांवर प्रत्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे व मुख्य अधिकारी प्रितम केसकर विडिओ काँफेरेन्स द्वारे देखरेख करीत होते.
याव्यतिरिक्त सभासद नोंदणी करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता येथे सुरू केली आहे. तसेच सदस्य शुल्क ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्विकारण्यात येत आहे. जेणेकरून सदस्य घरी बसून नोंदणी करून त्यांचा वेळ वाचवू शकतील.
स्वच्छ परिसर, निर्जंतुक स्वछतागृह, निर्जंतुक जिम व सर्व उपकरणे तसेच सदस्यांची काळजी घेण्यास संकुल पुनःश्च सज्ज आहे. सुरक्षा रक्षक व कार्यालयीन कर्मचारी वर्ग तसेच सर्व मॅनेजमेंट आपले स्वागत करीत आहे.
निरोगी वातावरणात खेळा आणि शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवा, असा संदेश प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू तसेच सचिव डॉ. मोहन राणे व मुख्य अधिकारी प्रितम केसकर यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी खालील ७७००९६७४२२,८८६६५२६४९७, ८१०४९७१०३७,९६५३४७५७७८, ०२२२६८३७७६६ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page