दर्पण लिटिल चॅम्प्स ठरली नवी मुंबईची समृद्धी जाधव!

दर्पण लिटिल चॅम्प्स ठरली नवी मुंबईची समृद्धी जाधव!

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन..

मसुरे /-

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने ८ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन गीतगायन स्पर्धा अर्थात दर्पण लिटिल चॅम्प्स २०२० स्पर्धेत वाशी, नवी मुंबईची समृद्धी जनार्दन जाधव ही विजेती तर संगमेश्वर -रत्नागिरीची सिद्धी संतोष कासारे उपवीजेती ठरली. प्राथमिक फेरीसाठी राज्यभरातून १०८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवडक २१ स्पर्धकांची महाअंतिम स्पर्धा घेण्यात आली. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून तीन दिवस दर्पण प्रबोधिनीच्या फेसबुक पेजवर मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. दर्पण लिटिल चॅम्प्स महागायिकासाठी प्रायोजक सुधा मानाजी तांबे यांजकडून जनार्दन विठ्ठल तांबे स्मरणार्थ रु. ४०००/- आणि दर्पण सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र आणि उपविजेता स्पर्धकांसाठी वि. रा. तांबे स्मरणार्थ राजदत्त विठ्ठल तांबे पुरस्कृत रु. ३०००/-आणि दर्पण सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र पुरस्कृत करण्यात आले होते
तृतीय क्रमांक सक्षम संदीप गजभिये ,वरुड ,अमरावती याची निवड करण्यात आली. त्याला मानाजी शिवराम तांबे स्मरणार्थ सायली चित्तरंजन तांबे पुरस्कृत रुपये २०००/-दर्पण सन्मानचिन्ह सन्मानपत्र देण्यात आले उत्तेजनार्थ (प्रथम) सुनंदा विठ्ठल तांबे स्मरणार्थ बाबूराव जनार्दन तांबे पुरस्कृत रु.१०००/-आणि दर्पण सन्मानचिन्ह ,विजेती -सलोनी महेश मेस्त्री (आचरा मालवण) हिला तर उत्तेजनार्थ (द्वितीय)
चित्तरंजन तांबे स्मरणार्थ बाबूराव जनार्दन तांबे पुरस्कृत रु.१०००/- आणि दर्पण सन्मानचिन्ह
विजेती -वैष्णवी दत्तप्रसाद प्रभु (सावंतवाडी) याला देण्यात आले.
दर्पण लिटिल चॅम्प्स विशेष कौतुकपात्र स्पर्धकांसाठी ए.वाय. जाधव ,जामसंडे पुरस्कृत प्रत्येकी रुपये १०००/- आणि दर्पण सन्मानचिन्ह विशेष कौतुकपात्र स्पर्धक पृथ्वी विनोद तांबे (सोनवडे कुडाळ) ,स्वरा अनुराधा अनिरुद्ध आचरेकर (आचरा, मालवण ), आणि संकल्प प्रदीप चौकेकर (ओसरगाव कणकवली) या तीन स्पर्धकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
सांस्कृतिक अभिसरणाची ही चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बालकलावंतांचा शोध घेऊन त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरणा देण्याची संधी मिळाली आणि ही सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी अनेकांना प्रेरणा देण्यात आली असे प्रतिपादन स्पर्धाप्रमुख सुधीर तांबे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम यांनी केले. संस्थेचे प्रमुख कार्यवाह आनंद तांबे यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे, मार्गदर्शक गुरूंचे,आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे आपल्या प्रास्ताविकामध्ये स्वागत करून संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

◆ *स्पर्धेमुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल!*

दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम म्हणाले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन ज्या लोककलावंतांनी ,भिमशाहिरांनी, जलसाकारांनी ही सांस्कृतिक चळवळ उभी केली ती पुढे घेऊन जाताना आता नव्या पिढीला या स्पर्धेच्या माध्यमातून नवी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याची गरज आहे. उद्याचा सांस्कृतिक भारत अधिक बलशाही करायचा असेल तर सर्व सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी व्यापक दृष्टिकोनातून पुढाकार घ्यायला हवा.
स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि प्रभावी तंत्रनिर्देशन व सूत्रबद्ध दृश्य सादरीकरण करण्यासाठी सहसचिव विशाल हडकर यांनी विशेष मेहनत घेतली .संस्थेचे उपाध्यक्ष अनिल तांबे ,खजिनदार नेहा कदम ,दर्पण महिला अध्यक्ष स्नेहल तांबे ,दर्पण स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष संदेश कदम आणि समस्त दर्पण परिवार ,सदस्य ,पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. तीन दिवस चाललेल्या या दर्पण लिटील चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळाचे सूत्रबद्ध, प्रभावी आणि अर्थवाही निवेदन शैलेश तांबे आणि संदेश तांबे यांनी केले . परिक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध संगीत विशारद संदीप पेंडुरकर प्रसिद्ध गायक ,गीत, संगीत संयोजक प्रा. सिद्धार्थ कदम आणि गझल गीतगायक, संगीतकार मकरंद कदम यांनी सांभाळली. दर्पण महाअंतिम सन्मान सोहळाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र कदम यांनी मानले.

अभिप्राय द्या..