चौके /-
चौके गावचे ग्रामदैवत स्वयंभू पाषाणरुपी देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रौत्सव कार्तिक कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक ७ डिसेंबर रोजी साजरा होत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर जत्रौत्सवाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करुन गावामर्यांदित हा जत्रौत्सव साजरा होत असल्याने सोमवारी सकाळपासून रात्री ९ पर्यंत ओट्या भरण्याचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक, चेंदवणकर गोरे दशावतार यांचा पारंपारिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी कोरोना संदर्भात जाहीर केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन जत्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटी, मानकरी यांच्याकडून करण्यात आले आहे.