श्री भद्रकाली मंदिरात श्रीफळ ठेवून आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातुन व जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांना सुरवात…
मालवण /-
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत मंजूर झालेल्या भद्रकाली मंदीर रोड खालची रेवंडी व देऊलकर घर रोड खालची रेवंडी तसेच जि.प.सदस्या सरोज परब यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचा शुभारंभ श्री भद्रकाली मंदीर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला.
रस्ता शुभारंभाप्रसंगी पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे-तळाशिलकर, सरपंच प्रिया कांबळी, उपसरपंच श्यामसुंदर तळाशिलकर,सदस्य युवराज कांबळी रमेश कांबळी, उपविभाग प्रमुख अमोल वस्त,शाखाप्रमुख संजय काबळी,जयराम कांबळी,पांडूरंग कांबळी,रवींद्र कांबळी,विजय कांबळी,अर्जून वराडकर,यशपाल पाटकर,अरुण कांबळी,संजय जूवेकर,विवेक कांबळी,साई वेंगुर्लेकर,प्रकाश कांबळी,ग्रामसेविका चेंदवणकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.