लेखी स्वरूपात निवेदन देऊन देखील तांत्रिक बाबींकडे बी.एस.एन.एल ऑफिसचे दुर्लक्ष !

कामगारांना सावंतवाडी शाखेत जाऊन पूर्ण करावे लागते कामकाज..

दोडामार्ग तालुक्यातील स्टेट बँक शाखा साटेली-भेडशी येथील गेले तीन आठवडे बी.एस.एन.एल नेटवर्क चा भोंगळ कारभार असल्याने कामकाज ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून कामगारांना देखील तारेवरची कसरत करत कामकाज करावे लागत आहे.सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत नेटवर्क ची वाट बघत बसणारा ग्राहकवर्ग सुद्धा त्रासलेला दिसत आहे, गेले तीन आठवडे नेटवर्क नसल्याने बँकेचे व्यवहार पूर्ण करणे कामगारांना कठीण झाले आहे त्यासाठी स्टेट बँकेतील कर्मचारी वर्गाला साटेली-भेडशी तून ४० किलोमीटर लांब असलेल्या सावंतवाडी शाखेत संध्याकाळी सहा वाजता जात कामकाज पूर्ण करावे लागत आहे बी.एस.एन.एल नेटवर्क संदर्भात दखल घ्यावी यासाठी साटेली-भेडशी स्टेट बँकेतील व्यवस्थापक यांनी दोडामार्ग बी.एस.एन.एल ऑफिसला भेट दिली असता ते बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्यांनी सावंतवाडी येथील बी.एस.एन.एल ऑफिसला भेट देत लेखी स्वरूपात निवेदन देखील दिले असून यावर कोणत्याही प्रकारची दखल बी.एस.एन.एल ऑफिसमधून घेतली नसून आपण गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु अपेक्षित असे उत्तर मिळत नसल्याचे व अद्याप पर्यंत नेटवर्क देखील नसल्याचे त्यांनी सांगितले आहे बी.एस.एन.एल नेटवर्कच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना काळात देखील ग्राहक वर्गाला गर्दी करत तासन् तास उभे राहावे लागत असून याची पूर्ण माहिती बी.एस.एन.एल ऑफिस सावंतवाडी येथे दिली असून देखील बी.एस.एन.एल ऑफिस कडुन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही तसेच ऑफिसचा एखादा कर्मचारी वर्ग सुद्धा याकडे फिरकून सुद्धा बघत नसल्याने बँकेच्या व्यवहारात पुर्णतः घट निर्माण झाली असून स्टेट बँक कर्मचाऱ्यांनी बी.एस.एन.एल कारभारा संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे असे स्टेट बँक शाखा साटेली भेडशी व्यवस्थापक यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page