सुरेश मापारी वेरली गावचे सुपुत्र..
मसुरे /-
मालवण तालुक्यातील वेरली गावचे सुपुत्र आणि मुंबई मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुरेश मापारी यांची मालाड पश्चिम विधानसभा भारतीय जनता पार्टी महामंत्री पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सुरेश मापारी यांचे सर्वस्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
सुरेश मापारी यांनी मुंबई मालाड येथे आणि मसुरे वेरली गावातील परिसरामध्ये आपल्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. मुंबई मध्ये लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सुरेश मापारी यांनी मालाड पश्चिम येथे दररोज सुमारे पाचशे गोरगरिबांना मोफत नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती. अनेक गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूचे वाटपही त्यांनी वेळोवेळी केले होते. अनेक रुग्णांना या कालावधीमध्ये मदतीचा त्यांनी हात दिला होता. त्यांच्या या कार्याची दखल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी घेऊन त्यांची मालाड पश्चिम विधानसभा महामंत्री पदी नियुक्ती केली. मसुरे वेरली गावातही अनेक गरजवंत यांच्या पाठीशी सुरेश मापारी हे नेहमी असतात. कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मुंबई व मालवण तालुक्यात मोठा वाटा असतो. मिळालेले पद हे जनतेचे असून आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवून मुंबई मालाड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून वेळोवेळी सामाजिक कार्य करण्याचा मानस यावेळी सुरेश मापारी यांनी व्यक्त केला.