खासदार विनायक राऊत यांच्याकडुन बिएसएनएल मोबाईल टॉवर स्वरुपात दिवाळी भेट..

कणकवली /-

खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ नेटवर्क असणारे कुंभवडे गाव काल रेंज मधे आले. कुंभवडे पंचक्रोशीमध्ये मोबाईल टॉवर नसल्याने गेली कित्येक वर्षे खुप समस्यांना ग्रामस्थांना रोजच खुप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन मोबाईल टॉवरची मागणी केली होती. खासदार राऊत यांनी यासाठी विशेष प्रयत्न करुन टॉवर मंजुर केला आणि कार्यांवित देखील केला.

मोबाईल टॉवर लोकार्पणचा सोहळा काल खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत, महिला संघटक मधुरा सावंत, संदेश पटेल, अँड.हर्षद गावडे, सरपंच आप्पा तावडे, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत सावंत, आनंद आचरेकर, प्रकाश बिले, गुरु पेडणेकर, मातोस डिसोझा, आजा पेडणेकर, पि.एम.सावंत, प्रदीप सुतार आदी ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page