अनंतशांती बहूऊद्देशीय सेवा संस्था व सहारा ग्रुपचा सामाजिक उपक्रम
कोल्हापूर /-
कोरोना महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी निस्वार्थीपणे लाँकडाउन पासुन आजअखेर प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या कोल्हापूर महापालिकेतील आरोग्य सेविका, क्लार्क, सपाई कामगार ,झाडु कामगार ,पाणी पुरवठा कर्मचारी अशा पन्नास हुन आधीक कर्मचा-यांचा अनंतशाती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापुर व कसबा वाळवे व सहारा एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कर्मचा-यांना साडी – चोळी, फेटा तर पुरुष कर्मचा-यांना कपडे, फेटा स्मृती चिन्ह प्रमाणपत्र कोविड योध्दा पुरस्कार देवून गैारव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मानवआधिकार न्याय सुरक्षा चे राष्ट्रीय सचिव महंमदयासीन शेख होते.
यावेळी महापालिकेच्या पन्नासहून अधिक कर्मचा-यांचा माजी उपमहापौर भुपाल शेटे, युवा कार्यकर्ते प्रसाद शेटे, ,मानवधिकार सुरक्षा ट्रस्टचे प्रदेश सचिव आमित वेगुर्लकर आदी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश नंदे, विनोद चोपडे, सोहेल मलबारी, फारुख पटवेगार, अबिद शेख, रफिक शेख, रियाज मुल्ला , मानवधिकारचे संजय शिदे, संस्थापक भगवान गुरव,अध्यक्षा डॅा.माधुरी खोत, सचिव अरुणा पाटिल, प्रमोद पाटिल प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमास ,आरोग्य सेविका मेघाराणी शिदे, विनायक कांबळे ,सुरेश लोखंडे,युवराज मधाळे, स्वागत शिवाजी माने यांनी केले तर अभार संजय घाडगे यांनी मानले.