सतत पंधरा वर्षे प्रामाणिक व उत्कृष्ठ कामगिरी.
सिंधुदुर्ग पोलीस दलात बॉम्ब शोध नाशक पथकात कार्यरत असलेले आंगणेवाडीचे सुपुत्र पोलीस हवालदार सुधीर कृष्णाजी आंगणे यांना सतत पंधरा वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्या बद्दल पोलीस महासंचालकांचे सन २०१९ चे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पोलीस खात्यात प्रामाणिक व उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल १ मेच्या पूर्व संध्येला पोलीस महासंचालकांकडून जिल्ह्यातील पंधरा पोलिसांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
आंगणे हे १९८८ साली महाराष्ट्र पोलीस दलात राज्य राखीव पोलीस दलात भरती झाले. यावेळी त्यांनी गडचिरोली येथील नक्षलवादी विरोधी अभियानात महत्वपूर्ण योगदान दिले होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटा नंतर झालेल्या दंगली वेळी बंदोबस्तात चांगली कामगिरी केली होती.
विविध क्रीडा प्रकारात ते नैपुण्य दाखवत असल्याने त्यांची “स्पोर्ट्स इंचार्ज” म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली होती.
राज्य राखीव पोलीस दलातून सिंधुदुर्ग पोलीस दलात त्यांची पोलीस मुख्यालय येथे नेमणूक झाली होती. पोलीस भरती झालेल्या अनेक नवप्रविष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘ड्रिल मास्टर’ म्हणून त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. यानंतर जिल्हा वाहतूक शाखा व सध्या ते बॉम्ब शोध व नाशक पथकात चांगली कामगिरी पार पाडत आहेत.आता पर्यंतच्या सेवेत आंगणे यांनी १७५ बक्षिसे मिळविली आहेत. सेवेत सतत उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस महा संचालकांकडून त्यांचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडी बद्दल आंगणेवाडी येथील भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, बाळा आंगणे, अनंत आंगणे, जयप्रकाश आंगणे, काका आंगणे, जयंत आंगणे, शशी आंगणे, गजानन (बाबू ) आंगणे, बाब्या आंगणे, नंदू आंगणे, मंगेश आंगणे, विनोद आंगणे, सचिन आंगणे यांच्या सह आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी अभिनंदन केले आहे.