आचरा /-
कोकण मित्र मंडळ आणि पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष, संचालक, कारखानदार आबा भाउ मेस्त्री वय ७५यांचे सोमवारी कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
कोल्हापूर मध्ये राहणा-या कोकणी माणसांच्या विकासासाठी कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या कोकण मित्र मंडळ आणि पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष होते. श्री विश्वकर्मा प्रगती मंडळ मुंबई चे ते सभासद होते.आचरा येथील विश्वकर्मा जयंती उत्सवात त्यांचा सहभाग नेहमी असायचा. कोल्हापूर येथे उपचारा दरम्यानच सोमवारी रात्री त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, पुतणे,सुना, नातवंडे जावंई असा परिवार आहे.आचरा येथील विश्वकर्मा मंडळाचे मंगेश मेस्त्री यांचे ते काका होत.