कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी सापडलेल्या अहवालानुसार चार (४) कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही. हि दिलासा देणारी घटना आहे. तालुक्यात आतापर्यंत ९३५ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात पिंगुळी १, रानबांबुळी २ तर नेरुर दुर्गवाडी १.तसेच तालुक्यात ३५५ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३१० कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९३५ तर बरे झालेले रुग्ण ७३७ आणि सक्रिय रुग्ण १७२ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २६ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..