▪️अँड बापू गव्हाणकर आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या ईशाऱ्यामुळे आरोपी गजाआड..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एकेकाळच्या माजी कँबीनेटमंत्री असलेल्या कै.भाईसाहेब सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या १२ वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थीनी असलेल्या नातीवर पाशवी लैगिक अत्याचार र्निदयी नराधमांकडून केला जातो दुर्दैवाने ही शालेय विद्यार्थीनी ना.दिपकजी केसरकर या शालेय शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघातील असूनही शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची तक्रार होऊन तब्बल १८ दिवस उलटले दुर्दैवी विद्यार्थीनीचा बाप न्यायासाठी अनेकांचे उंबरठे झिजवत असताना बापाला गप्प करण्यासाठी काही राजकीय मंडळींनी पैशाची अमिषे दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यातील विरोधी पक्ष दुबळा असल्याने शालेय विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचारानंतर १८ दिवसानंतर गून्हा दाखल होतो तरीही शालेय शिक्षणमंत्र्यांना जाब विचारणारा प्रखर विरोधीपक्ष सावंतवाडी अथवा जिल्ह्यात नाही हे आपले दुर्दैवच?

अखेर अँड बापू गव्हाणकर आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांचेपर्यत दुर्दैवी अत्याचारी मुलीचा बाप आपल्या गावातील काही ग्रामस्थांकडे पोहचल्यानंतर लगेचच हे प्रकरण अँड बापू गव्हाणकर यांनी स्वराज्य संघटनेकडे सोपविल्यानंतर स्वराज्य संघटनेचे अमोल साटेलकर सुनील पेडणेकर दिनेश गावडे कृष्णा धुळपणावर बाबू मेस्री, बाबू सावंत,व माडखोल गावातील महीला तरुण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच यांना सोबत घेऊन सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठले सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या संबधित पोलीस निरीक्षकांनी सदर लैगीक अत्याचार झालेल्या मुलीच्या तक्रारीचे प्रकरण तपासी पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांचेकडून काढून घेऊन कार्यक्षम पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपविताच पोलिसांनी लगेचच विद्यार्थीनीवर लैगिक अत्याचार केलेल्या त्या वासनांध र्निदयी विकृतीने पछाडलेल्या नराधमांना तात्काळ गजाआड केले आहे परंतू मुलीवर लैगिक अत्याचार करणारे ते वासनांध नराधम अत्याचारी मुलीच्या आईचे यार असल्याची तक्रार सदर मुलीच्या वडीलांनी केली आहे आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या मुलीच्या आईनेच केल्याचे उघड होऊनही सदर मुलीच्या आईवर गून्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी व काही ग्रामस्थांनी केली आहे.यामुळे मुलीच्या आईवर पोलीसांनी कारवाई न केल्यास सावंतवाडी पोलीस स्टेशनसमोर गून्हा करण्यास प्रवृत्त केलेल्या त्या महीलेला अटक होईपर्यंत कोणतीही आगाऊ नोटीस न देता आंदोलन करण्याची भूमिका मुलीच्या वडीलांनी व ग्रामस्थांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page