✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी.

शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे तरुण युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले विशाल बाबल्या जाधव यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली असून, त्याच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सद्या होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नवीन युवा कार्यकर्त्याने सोबत घेऊन जोमाने पुढे जाणार असून पक्षाचे प्रतोद व विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक काँग्रे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या लेखी आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष पदी विशाल बाबल्या जाधव यांच्या निवडीचे लेखी पत्र नुकतेच जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते यावेळी देण्यात आले. विशाल जाधव हे वैभववाडी या तालुक्यातील कोळपे या गावचे सुपुत्र असून विविध सामाजिक संघटनेत ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांचे संघटन निर्माण करून पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणिक काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन जिल्हा युवा अध्यक्ष विशाल जाधव यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page