✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे कावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे खाजणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे मागवणे,सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक, शिवराज मराठा विद्यालय सळगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सळगाव नं २, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नं ३ येथील ६१ गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.
सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह २७ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडाच्या १० विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे कावाच्या ५ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे खाजणवाडीच्या २ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे मागवणेच्या २ विद्यार्थ्यांना, सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुकच्या २ विद्यार्थ्यांना, शिवराज मराठा विद्यालय सळगावच्या १० विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सळगाव नं २ च्या १ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नं १ च्या १ विद्यार्थ्याला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नं ३ च्या १ विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा परिवारातर्फे छत्री वाटप करण्यात आले.
या छत्री वाटप उपक्रमासाठी अमित चव्हाण यांनी २ छत्र्या, गजानन लिखारे २ छत्र्या, शिवराम पराडकर २ छत्र्या, निखिल गावकर ५ छत्र्या, विनय खोचरे ५ छत्र्या, मनोज पास्ते ५ छत्र्या, मिनाक्षी सावंत २ छत्र्या, अभिनव भिंगारे ५ छत्र्या, उदय पाटील २ छत्र्या, पंढरी राऊळ २ छत्र्या, संतोष सावंत १ छत्री, विश्वनाथ राऊळ १ छत्री, औदुंबर कासार ३ छत्र्या, दिपाली परब ३ छत्र्या, वैभव परब २ छत्र्या, उमेश तानावडे १ छत्री, अजिंक्य गोसावी १ छत्री, प्रथमेश गावडे ३ छत्र्या, योगेश घाडीगांवकर २ छत्र्या, रामचंद्र कांबळी ५ छत्र्या, स्वाती नाटेकर २ छत्र्या, शंकर पावसकर १ छत्री, प्रसाद परब यांनी २ छत्र्या सौजन्य केले
सर्व दात्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून विशेष आभार गरजूंना मदत करताना छायाचित्र काढणे योग्य नसलेने सदर उपक्रमाचा फोटो काढण्यात आलेला नाही.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक छत्री देऊन सहकार्य करू शकता. (छत्री सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना छत्री वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवा.९८६०२५२८२५/९४२२२६३८०२ असे आव्हान दुर्ग मावळा परिवार कडून करण्यात आले आहे.
