✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
जून महिन्यापासून पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना जमेल तसे साहित्य खरेदी करून शाळेत पाठवत असतात. ग्रामीण भागात ज्या पालकांची एकाहून जास्त पाल्य असतात त्या पालकांना आपल्या सर्व पाल्यांना छत्री देणे परवडते असे नाही.अशा गरजू विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने छत्री उपलब्ध करून देण्याचा दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक छत्री देऊन सहकार्य करू शकता. (छत्री सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना छत्री वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवा.९८६०२५२८२५ /९४२२२६३८०२. असे आव्हान दुर्ग मावळा परिवार कडून करण्यात आले आहे.
