✍🏼लोकसंवाद /-कुडाळ समील जळवी

कुडाळ शहरातील कविलकाटे येथे राहणारी युतीका गजानन पालव हीला यंदाच्या १० विच्या परीक्षेत कुडाळ हायस्कूल, कुडाळ या प्रशालेत युतीका हिने ४८४ येवढे गुण मिळवित ९६.८० टक्के प्राप्त करत कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेत तिने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

तसेच पहील्या नंबर साठी राधिका तेरसे हिने ४९१ मार्क मिळवत ९८.२०% टक्के मिळविले तर, वरद माईणर याने सेम गुण मिळवित ४९१ येवढे मार्क प्राप्त करत ९८.२०% टक्के मिळविले आहेत.आणि युतीका पालव हिने ४८४ येवढे गुण मिळवत ९६.८० टक्के मिळवित तिसरा क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेत पटकविला आहे.

युतीका गजानन पालव कुडाळ शहरातील कविलकाटे ही ऐक मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील श्री.गजानन पालव हे मंडप डेकोरेटर अँड कॅटरिंग व्यावसायिक असून आपल्या वडिलांच्या व्यवसायात थोडा फार हातभार लावत तिने १० वीच्या परीक्षेत उज्वल यश आज प्राप्त केले आहे.तिच्या आई आणि वडील यांना देखील आपली मुलगी युतिका हीला चांगले गुण मिळविल्याबद्दल तिचा सार्थ आभिमन आहे.

युतिकाने पालव हिने कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कविलकाटे येथील ग्रामस्थांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. रमेश हरमलकर , पत्रकार श्री.समील जळवी ,श्री.दयानंद मसुरकर ,श्री. राजन जळवी ,श्री. निलेश जळवी ,श्री.प्रसाद जळवी ,साईनाथ जळवी, अण्णा जळवी,भरत हरमलकर,अमित जळवी, दिनेश गावडे, दादा जळवी यांनी युतिकाला तिच्या घरी जाऊन भेट देत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page