✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदूर्गनगरी.

जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाईपदासाठीच्या पदभरतीत दोन उमेदवारानी तोतयेगिरी करीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडले. मैदानीसह लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर नियुक्तीपत्रापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट निघाले.

ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते रा. जांब,शिरूर कासार जिल्हा,बीड, व कृष्णा राजेंद्र राचमले रा. मावलगाव अहमदपूर जिल्हा,लातूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर आणि बीड जिल्ह्यातील या दोन उमेदवारांनी बनावट भूकंपग्रस्त आणि आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पोलीस भरती करता सादर केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी याची गंभीर दखल घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या उमेदवारा व त्यांना कामांमध्ये मदत करणाऱ्या इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सिंधुदुर्ग पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

गुन्हातील आरोपींचा शोध घेण्याकरता तपास पथके रवाना करण्यात आली आहे.पोलीस शिपाई भरती बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page