लोकसंवाद /- सावंतवाडी.

शिव संस्कार संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘ शिव चरित्र ‘ स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी गटातून ८१ % गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल गोवा राज्याचे मान. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मृण्मय चंद्रकांत चंद्रकांत शिरोडकर याला गौरवण्यात आले, सदर कार्यक्रम साखळी गोवा येथे पार पाडला यावेळी बिचोलींचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटे आणि छत्रपती संभाजी या मालिकेतील गणोजी शिर्के यांची भूमिका करणारे सिनेस्टार स्वप्नील राजशेखर, डॉ. सोनल लेले तसेच शिवसंस्कारचे अध्यक्ष श्री.ठाकूर सर उपस्थित होते. सदर विद्यार्थी मदर क्विन इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिक्षण घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page