✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कै. सुरेश सुदिक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यामाने हुंबरणेवाडी पूर्नवसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत ओम गणेश स्पोट्स संघाने ब्लू स्टार संघावर 40 धावांनी मात करत विजयते पद पटकवले. विजेता व उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग,यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संतोष मुरकर, महेश मुद्रस, सतिश तेली, ग्रा. पं. स. नंदकिशोर परब, भरत घाडीगावकर, रुजय फर्नाडिस, रविंद्र घोगळे, मांजरेकर, सागर शिर्के, दिलीप कानकर, आमरेश सातोसे, सुधीर हळवे आदि उपस्थित होते.

स्पर्धेत 18 संघ सहभागी होते. अंतिम सामन्यांत ओम गणेश स्पोट्स संघाने 4 षटकार 55 धावा केल्या प्रत्युतरादाखल ब्लू स्टार संघाने 15 धावा करू शकला. ओम गणेश स्पोट्स संघाच्या आदेश याने उत्कृष्ट फज़ी करून विजयाचा मार्ग सुकर केला. स्पर्धेत मालिकावीर सूरज घाडीगावकर (ओम गणेश स्पोट्स) घाडीगावकर (ओम गणेश स्पोट्स) उत्कृष्ट फलंदाज संदेश उत्कृष्ट गोलंदाज राजू (ब्लू स्टार) यांनाही गौरवण्यात आले. तत्पूर्वी उपांत्य फेरित साई स्पोट्स व क्षेत्र पालेश्वर या दोन्हीही पराभूत संघाने बहारदार खेळ करून रसिकांची मने जिंकली.

स्पर्धेत पंच म्हणून मोहित सावंत, वैभव मुरकर, गुणलेखन वैभव चव्हाण व भाई कानडे, समालोचन मारुती घाडीगावकर व सचिन घाडीगावकर यांनी काम केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सम्राट शिर्के व मिथीलेश शिरोडकर अक्षय मुरकर, चिन्मय मृणमय वारंग, रमेश सुद्रिक, प्रथमेश परब, आनंद राणे, गणेश चव्हाण, यश लाड, संजय तेली, कृष्णा घाडिगावकर, संजय गोसवी, शैलेश दळवी याने काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page