दोडामार्ग/-

शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई कुलदेवता पंचायतन देवस्थानचा १५ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.
नवसाला पावणारी देवी अशी श्री देवी सातेरीची ओळख असुन वर्धापन दिनानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असुन गुरुवारी सकाळी १० वाजता विविध देवांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आरती व तीर्थप्रसाद,१.३० वाजता महाप्रसाद,४.०० वाजता ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन,९.०० वाजता पावणीचा कार्यक्रम, आणि रात्री १०. वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्य प्रयोग होणार असुन या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिरंगे ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page