✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
कणकवली शहरातील दोन मुलींना फूस लावून नेल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार मुरगेंद्र रामू शिंदे (वय ४०, रा. वरवडे – सुतारवाडी) यांनी दिली आहे. मुरगेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, आपली अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास शहरातील हायस्कूल येथे गेल्या. तेथून रिक्षाने भालचंद्र महाराज यांच्या मठाजवळ जावून तेथून त्यांची मैत्रीणकडे जात असल्याचे सांगून निघून गेल्या. मात्र, रात्री दोघी घरी न परतल्याने फिर्यादी यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता त्या सापडून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींना पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादंवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
