निवडणूक आयोगाचा निर्णय; शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नवीन नाव…
मुंबई /-
शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाला आज काहीसा दिलासा मिळाला आहे. यात ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव मिळाले असून “मशाल” चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला “बाळसाहेबांची शिवसेना” नाव देण्यात आले असून चिन्हासाठी ३ नवीन पर्याय देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.याबाबत निर्णय उशिरा राज्य निवडणूक आयोगाकडुन देण्यात आला.
