आचरा /-अर्जुन बापर्डेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहिर झालेल्या शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्तीत आचरे गावचे सुपुत्र माजी आमदार किरण पावसकर यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे मुंबई येथे प्रदान करण्यात आली.
यात शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.
किरण पावसकर यांनी शिवसेनेतून कामगार नेता म्हणून स्वच्छ आणि प्रामाणिक कामातून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती विधान परिषदेच्या कार्यकाळत त्यांनी आपल्या कार्याची वेगळि ओळख निर्माण केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संंबंधातून आणि पावसकर यांची स्वच्छ राजकीय कारकिर्द बघून मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसकर यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवली आहे.