वेंगुर्ला /-

दि 12 जुलै मनसे वेंगुर्ला च्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉक्टर प्रवीण देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू उपकरणे, ह्याबद्दलचा आढावा घेतला.स्पेसिएलिस्ट डॉक्टर कधी पर्यंत उपलब्ध होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी हमी उपस्थित मनवीसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली.
स्वच्छता गृहामध्ये पारंपारिक टॉयलेट वर आजारी किव्वा वृद्ध व्यक्तींना बसण्यास त्रास होत होता ते लक्षात घेऊन तालुका अध्यक्ष श्री सनी बागकर ह्यांनी स्वतःकडून एक टॉयलेट चेअर हॉस्पिटल साठी दान म्हणून दिली.
मनसे वेंगुर्ला च्या सदर शिष्टमंडळात, परशुराम उर्फ आबा परब,महादेव तांडेल,आबा चिपकर,रोहित म्हाकले,प्रथमेश नाईक आणि सूर्यकांत गावडे हे मनसे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page