वेंगुर्ला / –

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू उर्फ पपू परब,गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,उपसरपंच हेमंत गावडे,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.भाकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष नितीन बांदेकर,संदेश परब,वेंगुर्ले गट साधन केंद्रतील सर्व विषय शिक्षक,मुख्याध्यापक अनिता रॉड्रिग्ज ,ग्रामसेवक प्रविण नेमण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक झोरे यांनी तर मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक यांनी केले.आधुनिक शेती व पारंपरिक शेती विषयी मार्गदर्शन सौ.कोरगांवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संतोष गोसावी यांनी मानले. या उपक्रमअंतर्गत मुलांना रानभाज्या,गावठी भाज्या,बियाणे,मसाल्याचे पदार्थ,कडधान्ये,सेंद्रिय खत शेतीतील पारंपरिक अवजारे, कलमे व रोपे याचे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले.यासाठी सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. त्याचबरोबर मुलांना भातशेतीचे नांगरणी व पेरणी संदर्भात माहीत म्हणून सर्व मुलांना कणकेवाडीत बांधावर नेऊन त्यांच्याकडून भात लावणीचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यावेळी अर्जुन उर्फ भोले परब व शेखर नाईक यांच्या बैल नांगरणीसाठी सहकार्य मिळाले. माजी उपसपंच संतोष सावंत, संजय मळगावकर, ग्रा.सदस्य अर्चना परब, कृतिका साटेलकर,ग्लानेस फर्नांडीस,सखी पवार, महिला बचत गट च्या वतीने गौरी सावंत,ॲना डिसोझा, अनुजा परब,नयना सावंत, शीतल नाईक, विशाखा पवार,प्राची पवार, स्वरा देसाई,निता पवार,दर्शना परब,सागर आवळेगावकर,विशाल जाधव , अक्षय परब, सायमन आल्मेडा, सिद्धेश कापडोसकर, युवराज नाईक,पार्थ सावंत यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page