सावंतवाडी/-

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची ” लोकसभा प्रवास योजनेची ” बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी – राजवाडा येथे संपन्न झाली .यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रभारी रणजित देसाई व विधानसभा संयोजक महेश सारंग उपस्थित होते . यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची कोअर कमीटी गठीत करण्यात आली .
यावेळी विधानसभा स्तरावरील नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली . तसेच प्रत्येक मंडल अध्यक्षांना आप आपल्या मंडलातील पदाधिकारी यांची नावे – सोशल मीडीया टीम , मीडीया टीम , कायदा ( विधी ) , केंद्र सरकारच्या योजनांसाठीची समिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी प्रत्येक मंडल अध्यक्षांकडुन बुथसक्षमीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला .
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वेंगुर्ले , बांदा ,सावंतवाडी , आंबोली व दोडामार्ग मंडलातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते .
बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी आणि आभार प्रदर्शन आंबोली मंडलाचे प्रभारी रविंद्र मडगांवकर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page