कुडाळ /-

इंडियन मेडिकल असोसिएशन के एस व्हि एस, रोटरी क्लब ऑफ कुडाळ ,लायन्स क्लब ऑफ कुडाळ तसेच प्रिन्स स्पोर्ट्स क्लब आणि समादेवी मित्र मंडळ कुडाळ यांचे मार्फत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.
डॉक्टर बी सी रॉय यांचा जन्म व निर्वाण दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो डॉक्टर रॉय यांचे मेडिकल सायन्स तसेच रुग्णापती केलेले काम हे केवळ कल्पनातीत व अविस्मरणीय असल्याने त्यांच्या सेवेचा आदर राखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
यावर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वे वर्षे साजरे करीत असून स्वास्थ्य व कुटुंब मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत डॉक्टर्स डे विशेष सदिच्छा देण्यात आलेल्या आहेत डॉक्टरांनी कोविड काळात केलेल्या काम विसरून चालणार नाही कोविडच्या युद्धात कित्येक डॉक्टर तसेच वैद्यकीय स्टाफने आपल्या प्राणांची आहुती देऊन समाजाचे रक्षण केलेले आहे हे बलिदान व्यर्थ जाउ नये यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन्स आयोजित करावीत तसेच एक शाम डॉक्टर के साथ , चला डॉक्टरांच्या भेटीला इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत असे स्वास्थ्य मंत्रालयांचे आदेश प्राप्त झालेले आहेत डॉक्टर स्वतःच्या रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्याच्या सुखदुःखात त्याच्याबरोबर उभे राहतील असे यावर्षीचे ब्रीदवाक्य असून ते सत्यात उतरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील
इंडियन मेडिकलचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे म्हणाले की सर्व डॉक्टर्सना डॉक्टर असले बाबत पूर्ण अभिमान आहे आणि या सेवाभावी व्यवसायामध्ये सेवा देताना नेहमीच समाधान लाभते पण हल्ली छोटे हॉस्पिटल क्लिनिक्स हे चालवण्यासाठी नॅशनल मेडिकल कौन्सिलचे अत्यंत कठीण अशी नियमावली आल्यामुळे ही सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या आवाक्यात रुग्णसेवा देणारी यंत्रणा कोलमडून पडेल की काय अशी भीती वाटते कार्पोरेट हॉस्पिटल्सना असे नियम पाळणे सहज शक्य होते त्यामुळे कार्पोरेट्सना खत पाणी घातल्यासारखे होईल तसेच अशा हॉस्पिटलचे उपचाराचे दर हे सामान्य माणसाच्या अवाक्यपलीकडील असतात छोटे क्लिनिक्स व छोटे हॉस्पिटल्स वाचवण्यासाठी यासाठी सरकारने विशेष ती उपायोजना करायला पाहिजे
याचबरोबर डॉक्टर रुग्ण यांचे संबंध दिवसेंदिवस ताणतणावाचे होत चाललेले आहेत म्हणून डॉक्टर रुग्ण यांच्यामध्ये चांगला समन्वय असायला हवा तसेच रुग्णांनी डॉक्टर्सवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा आणि अडचणी ह्या चर्चेतून सोडवल्या जाऊ शकतात हॉस्पिटलची तोडफोड तसेच हिंसाचार हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही
येणाऱ्या वर्षात शाळेतील मुलांसाठी आरोग्य तपासणी तसेच आरोग्य शिक्षण रक्तदाब डायबिटीस सारख्या जुनाट आजारांसाठी समुपदेशन व उपचार आरोग्य शिबिरे आणि डॉक्टरांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे डॉक्टर संजय केसरे यांनी सांगितले
या शिबिरासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे सचिव डॉक्टर अमोघ चुबे रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अमित वळ‌ंजू लायन्स क्लब कुडाळचे अध्यक्ष समीर कुलकर्णी तसेच प्रिन्स स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष डॉक्टर संजय निगुडकर व सर्व सन्माननीय सभासद उपस्थित होते सुमारे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले

डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन 94 22 436 933

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page