दोडामार्ग /-

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग, लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुका २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत रक्तगट हिमोग्लोबिन तपासणी शिबीरात ५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ५८ पैकी ०२ निगेटिव्ह रक्तगट सापडले तर ५८ पैकी १४ जणांचे हिमोग्लोबिन कमतरता जाणवली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अरुण खानोलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, दोडामार्ग अध्यक्ष विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष श्री.तुळसकर व सौ.गीतांजली सातार्डेकर, सचिव संतोष सातार्डेकर, एन.एस.एस. विभागाचे प्रा. दिलिप बर्वे, प्रा.श्री. इंगळे, दोडामार्ग तालुका आरोग्य विभागाचे कार्यक्रम सहाय्यक तथा प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख अजित सावंत, आरोग्य सेविका श्रुति शिरोडकर, रेश्मा क्षीरसागर, रजनी बुटे, आरोग्य परिवेक्षक सदाशिव आयनोडकर, प्रतिष्ठानचे सहसचिव वैभव रेडकर, रामकृष्ण दळवी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख भूषण सावंत यांनी तर आभार एन.एस.एस. प्रमुख दिलीप बर्वे यांनी मानले. सीताराम हळबे महाविद्यालय, एन.एस.एस. विभाग, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, दोडामार्ग आरोग्य विभाग यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page