कणकवली /-

कणकवली शहरातील कोकण क्रिस्टल केबल कार्यालयाच्या टेरेसवर काल २४ मे रोजी रात्री ८ ते सकाळी ९.४५ या वेळेत एका परप्रांतीय युवकाने आत्महत्या केली. कृष्णकुमार जयसिंग मरावी (वय २०, रा. मध्य प्रदेश) असे त्या युवकाचे नाव आहे. कार्यालयावरील शेडच्या लोखंडी अँगलला गळफास लावून घेत आत्महत्या केली.त्याच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने त्याची ओळख पटली असून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत खबर जोगिंदर वर्मा यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page