वेंगुर्ला / –

विद्यार्थ्यांनी विविध कलांचे छंद जोपासताना त्यात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवल्यास त्याच कला भविष्यात रोजगार मिळवून देणाऱ्या ठरु शकतील, असे प्रतिपादन सुरंगपाणी कार्यक्षेत्राचे केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांनी दाभोली येथे केले.
दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला,यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल राऊत, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी अनुक्रमे जिल्हा परिषद केंद्र शाळा सुरंगपाणी  – प्रथम चेतन एकनाथ पेडणेकर, द्वितीय कौशल वैभव तांडेल, तृतीय पलाश प्रविण राजापूरकर, उत्तेजनार्थ खुशी रघुनाथ मुणनकर व ईशा अरुण आरोलकर. खानोली शाळा नंबर १ – प्रथम मनोहर सदाशिव खाडे, द्वितीय ओमगणेश उमेश सामंत, तृतीय सोहम संतोष खानोलकर, उत्तेजनार्थ गणेश लक्ष्मण खानोलकर व सांजवी पांडुरंग सरमळकर. खानोली नाईकवाडी प्रा. शाळा – प्रथम रमाकांत महेंद्र सातार्डेकर, द्वितीय पल्लवी अर्जुन नाईक, तृतीय चैत्रागौरी धनंजय नाईक, उत्तेजनार्थ चैत्रगौरी श्रीनाथ गावडे व रविंद्र सुनिल राऊळ. जि. प. वायंगणी शाळा नंबर २- प्रथम पूर्वा विठ्ठल साळगावकर,  द्वितीय बलराम किर्तीश तोरसकर, तृतीय मिताली केशव वराडकर, उत्तेजनार्थ ओमकार निवृत्ती तोरसकर व दक्षता विजय म्हाकले. जि. प.दाभोली  शाळा नंबर १ –  प्रथम मयंक विनायक दाभोलकर, द्वितीय सृष्टी यशवंत गोलतकर , तृतीय साई दत्तप्रसाद साळगावकर, उत्तेजनार्थ हेरंब सुधीर गोलतकर व सर्वेश संजय माडकर. जि. प.दाभोली शाळा नंबर २ – प्रथम मनस्वी अनंत बांदवलकर, द्वितीय तनया संजय बोवलेकर, तृतीय सुयश संदिप गोखले, उत्तेजनार्थ सानवी सुभाष जोशी व अमृता दिगंबर हरमलकर. इत्यादींना तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गेली ३ वर्षे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पद भूषविणारे आणि कोरोना काळातही शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणारे सुनिल राऊत यांचा केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.पंचक्रोशीतील प्राथमिक शाळातील सर्व मुख्याध्यापक व ६२ सहभागी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी सुरंगपाणी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शामल मांजरेकर, वायंगणी नं.२ चे मुख्याध्यापक रविंद्र कांबळे  यांनी प्रसंगोचित विचार मांडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक रेश्मा चौडणकर, वसंत पवार, स्वप्नाली मुननकर, स्वप्नाली कांबळी, अश्विनी कांबळे, दिपक पाटील, कर्मचारी नितीन घोगळे, आबू मिषाळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे  प्रास्तविक व परिचय रेश्मा चौडणकर व स्वप्नाली मुननकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page